lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

ह्या आठवड्यात आपणास कारकिर्दीत - व्यवसायात अपेक्षित प्रगती होत असल्याचे दिसू लागेल. धनलाभ उत्तम होणार आहे. ह्याच बरोबर आपल्या संचित धनाची सुद्धा वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांचे प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण होतील. ह्या दरम्यान कोणत्याही वापरात नसलेल्या वस्तूंचा आपणास त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांच्या साथीनेच कामे करावी लागतील. मुलांशी संबंधित एखादी चिंता आपणास सतावू शकते. व्यक्तिगत जीवनात सुद्धा वैवाहिक जोडीदाराशी वाद किंवा भांडण होऊ शकते. प्रणयी जीवनात सावधपणे पाऊले टाकावीत. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणे टाळावे, अन्यथा सामाजिक कलंक लागण्याची संभावना आहे. आठवड्याच्या अखेरीस दूरवरचे प्रवास संभवतात. प्रवासात आपल्या प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी. त्याच बरोबर वाहन चालवताना सावध राहावे.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05