lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

ह्या आठवड्यात कोणताही निर्णय क्रोधीत होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, अन्यथा निव्वळ धनहानीच नाही तर वर्षानुवर्षां पासूनच्या नात्यात सुद्धा कटुता निर्माण होऊ शकते. जर एखाद्या समस्येचे निराकरण करणे आपणास जमत नसेल तर एखाद्या शुभचिंतकाचा सल्ला घ्यावा. द्विधा मनःस्थिती असताना कोणताही निर्णय पुढे ढकलणे हितावह होईल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध दिलासा देणारा आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांची आपल्यावर मेहर नजर राहील. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना ह्या आठवड्यात अपेक्षित लाभ होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनास अचानकपणे एक नवीन व वेगळे वळण लागू शकते. कोणताही गैरसमज वाद न घालता संवादाने दूर करावा. वैवाहिक जीवन सुखद होईल. ऋतुजन्य व जुनाट आजारां पासून सावध राहा.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05