lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

संतोषातच परम सुख असते हे आपणास ह्या आठवड्यात लक्षात ठेवावे लागेल. जीवनात जे काही परिश्रम व प्रयत्न करून प्राप्त झाले आहे ते काही कमी नाही. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास आपल्या प्रत्येक कार्यात मग तो व्यापार असो किंवा विद्यार्थी जीवन असो, त्यात थोडा धिमेपणा असल्याचे जाणवले तरी सुद्धा प्रगती होताना दिसून येईल. महत्वाच्या कार्यात थोडा त्रास संभवतो. ह्या आठवड्यात आपणास वाणी संयमित ठेवावी लागेल, अन्यथा होत असलेली कामे बिघडू शकतात. आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिक दृष्ट्या मजबूत असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल. प्रेम संबंधात गोडवा येईल. प्रेमिकेच्या सहवासात हसत खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबियांसह एखादा छोटासा प्रवास संभवतो. प्रकृती सामान्यच राहील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05