lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

ह्या आठवड्याच्या सुरवाती पासून आपणास जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांच्या समस्यांचे निराकरण करताना आपल्या स्वकीयांच्या भावना दुर्लक्षित करू नका. कारकीर्द असो किंवा व्यवसाय, ह्या आठवड्यात योजनाबद्ध राहून कार्य करणे लाभदायी होऊ शकेल. अन्यथा आपली होत असलेली कामे सुद्धा स्थगित होण्याची संभावना आहे. व्यवसायात आपल्या कार्यक्षमतेनुसारच कार्य विस्तार करण्याचा विचार करावा. लोकांचे ऐकून कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक अजिबात करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. ह्या दरम्यान एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कठीण प्रसंगी आपली प्रेमिकाच आपली शक्ती होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. महिलांचा बहुतांश वेळ धार्मिक कार्यात जाईल.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05