lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 तूळ

तूळ

हा आठवडा आपल्यासाठी सुखदायी, सौभाग्यदायी व उन्नतीदायी होणार आहे. ह्या आठवड्यात योजनाबद्ध कामे केल्यास यशस्वी होता येईल. कुटुंबात शुभ, मंगल, धार्मिक कार्य संपन्न होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थितीत सामान्य झाली तरी सुधारणा नककीच होईल. कार्यक्षेत्री आवडते काम किंवा आवडत्या जागी बदली मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. जमीन - जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येऊन त्यांच्या खरेदी - विक्रीतून लाभ होईल. आपली हि इच्छा पूर्ण करण्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे किंवा मित्राचे विशेष सहकार्य प्राप्त होईल. दुकानदारी पेक्षा फुटकळ व्यापार करणाऱ्यांना जास्त लाभ होईल. असे असले तरी व्यापारात योजनाबद्ध कार्य केल्यास लाभ होण्याची संभावना वाढेल. प्रेम संबंधात प्रगल्भता येईल. आपसातील विश्वास वाढेल. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रकृती सामान्यच राहील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05