lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 मीन

मीन

ह्या आठवड्यात कामा निमित्त आपणास सारखे प्रवास करावे लागण्याची संभावना आहे. कुटुंबाशी संबंधित समस्यांमुळे मन चिंतीत होईल. जमीन - जुमला किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित वादांमुळे आपणास कोर्ट - कचेरी करावी लागू शकते. परंतु, कोर्टाच्या बाहेर आपसात बोलणी करून वाद संपुष्टात आणणे हितावह होईल. कार्यक्षेत्री आपले विरोधक सक्रिय होतील. अशा परिस्थितीत लहान - सहान गोष्टींना थारा न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कार्यक्षेत्री सर्वांशी समन्वय साधणे हितावह होईल. आपण जर व्यवसाय करत असाल तर कोणत्याही योजनेत विचारपूर्वकच आर्थिक गुंतवणूक करावी. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रणयी जीवन असो किंवा कौटुंबिक जीवन, त्यात गैरसमज दूर करण्यासाठी वाद घालण्या ऐवजी संवाद साधावा. कोणत्याही परिस्थितीत स्वजनांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05