lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 मकर

मकर

आठवड्याच्या सुरवातीस धार्मिक - सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबियांसह एखादा प्रवास सुद्धा संभवतो. ह्या दरम्यान आपली प्रकृती चांगली राहील. मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपण सुदृढ असल्याचे आपणास जाणवेल. थकबाकी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. मात्र, ह्या आठवड्यात अशा कोणत्याही योजनेत कि ज्यात जोखीम असल्याची शंका असेल त्यात पैसे गुंतवण्याचे धाडस करू नका. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील. धन - संपत्तीत वाढ होईल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने जमीन - जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होईल. प्रणयी जीवनात एकमेकांवर विश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारे आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. कोणत्याही कठीण प्रसंगात आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे ठाम उभा राहील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05