आज चंद्र 09 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती व पाण्यापासून दूर राहणे हितावह राहील. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा.