Flashback 2015 - आंतरराष्ट्रीय घडामोडी

By admin | Published: December 29, 2015 12:00 AM2015-12-29T00:00:00+5:302015-12-29T00:00:00+5:30

२२ डिसेंबर :- अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात यश प्राप्त केले. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे.

नोव्हेंबर : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या फ्रान्सच्या पॅरिसमध्ये वर्षाअखेरीसही (१३ नोव्हेंबर) इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे १३० जण मृत्यूमुखी पडले.

ऑक्टोबर : नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर तिथले जीवनमान सावरत असतानाच २६ ऑक्टोबर रोजी हिंदुकुश पर्वत भूकंपाने हादरला. ७.५ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुले पाकिस्तानमध्य २७९ अफगाणिस्तानात ११५ तर भारतात ४ नागरिक मृत्यूमुखी पडले.

सप्टेंबर : - हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन सुमारे २ हजार भाविक मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सौदी अरेबियात घडली. या घटनेत ९०० हून अधिक भाविक जखमी झाले तर सुमारे ६५० भाविक बेपत्ता झाले.

ऑगस्ट : थायलंडच्या बँकॉकमध्ये धार्मिक स्थळी झालेल्या स्फोटात २० जण ठार तर सव्वाशेहून अधिक नागरिक जखमी झाले.

जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौ-यादरम्यान बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून भिजत पडलेल्या सीमावादाच्या प्रश्नावर अखेर ४४ वर्षांनी तोडगा निघाला. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर भारत व बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमेवरच्या अनेक गावांच्या अधिपत्यावरून वाद सुरु होता. अखेर या वादावर तोडगा निघाला आणि भारतातील १११ गावं बांगलादेशमध्ये तर बांगलादेशातील ५१ गावं भारताच्या अधिपत्याखाली आली.

ब्रिटनचे युवराज विलियम्स व युवराज्ञी केट मिडलटन हे २ मे रोजी एका गोंडस मुलीचे पालक बनले. लंडनच्या सेंट. मेरी रुग्णालयात तिचा जन्म झाला. प्रिन्सेस कॅरोलेट असे तिचे नामकरण करण्यात आले.

२५ एप्रिल नेपाळला ७.९ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसल्याने हा देश अक्षरश: हादरला. या दुर्दैवी घटनेत ९ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर २३ हजारांवर नागरिक जखमी झाले. या भूकंपात सर्व गमावल्याने लाखो लोक बेघर झाले.

२४ मार्च रोजी एअरबस A३२०-२११ हे जर्मनविंग्सचे विमान आल्प्स पर्वतांत कोसळल्याने सुमारे दीडशे प्रवासी मृत्यूमुखी पडले.

संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेला २०१५ सालचा विश्वचषक फेब्रुवारीत पार पडला. अंतिम फेरीत न्युझीलंडला नमवून ऑस्ट्रेलियाने पुन्हा एका विजेतेपदावर नाव कोरले. २०११ साली विश्वचषक पटकावणारा भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटरसिकांच्या आशा उंचावल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला चारी मुंड्या चीत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला व तेथे न्युझीलंडच्या संघालाही हरवत विजेतेपद पटकावले.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे औचित्य साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर आले होते. ओबामा यांच्या ३ दिवसीय दौ-यादरम्यान भारत-अमेरिकेदरम्यान अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्ष-याही झाल्या.

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे ७ जानेवारी २०१५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी