उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:09 PM2024-05-02T15:09:27+5:302024-05-02T15:22:44+5:30

High Cholesterol Level: कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी रोजच्या आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल (Cholesterol) वाढल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी रोजच्या आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

आवळामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड हे गुणधर्म असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल असते. पॉलीफेनॉल शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.

लिंबूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आहे जे उच्च रक्तदाब कमी करते आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी करते.

पालक या भाजीमध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे मिनरल्स आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतात.

डिस्क्लेमर : सदर माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सविस्तर माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.