भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

१ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:46 PM2024-05-06T18:46:40+5:302024-05-06T18:47:22+5:30

whatsapp join usJoin us
INDIA'S T20 WORLD CUP JERSEY LAUNCH IN DHARAMSHALA, Rohit, Jadeja, Kuldeep featured in the launch video | भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDIA'S T20 WORLD CUP JERSEY LAUNCH  १ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे.  या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यात ९ जून २०२४ मध्ये न्यू यॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि त्यासाठी आज जर्सीचं अनावर झालं.  


हार्दिक पांड्याच्या निवडीवरून या बैठकीत भरपूर चर्चा झाली. रोहित शर्मासोबत सलामीला यशस्वी जैस्वाल याचे स्थान पक्के होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव हेही पक्के होते. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंत फ्रंट रनर असला तरी दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅसमन व लोकेश राहुल यांच्याबाबत चर्चा केली गेली.  संजू सॅमसनने बाजी मारली.  हार्दिकने संघातील जागा कायम राखलीच, शिवाय उप कर्णधारपदही टिकवलं आहे. आयपीएल गाजवणाऱ्या शिवम दुबेला संधी देण्याचा योग्य निर्णय निवड समितीने घेतला आहे. युझवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. संजूच्या मेहनतीला यश मिळालं आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 
 

Web Title: INDIA'S T20 WORLD CUP JERSEY LAUNCH IN DHARAMSHALA, Rohit, Jadeja, Kuldeep featured in the launch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.