वसई पालिकेत नवे अतिरिक्त आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:02 PM2024-03-28T12:02:58+5:302024-03-28T12:03:12+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधी पालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि सहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या.

New Additional Commissioner in Vasai Municipality | वसई पालिकेत नवे अतिरिक्त आयुक्त 

वसई पालिकेत नवे अतिरिक्त आयुक्त 

नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संजय हेरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चार उपायुक्तांचीही नेमणूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधी पालिकेतील अतिरिक्त आयुक्त 
आणि सहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या.

पालिकेत दीपक झिंझाड, गणेश शेटे, प्रियांका राजपूत, अर्चना दिवे यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या डॉ. किशोर गवस यांची उल्हासनगर महापालिका उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 वसई-विरार पालिकेतील उपायुक्त पंकज पाटील आणि तानाजी नरळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. विजयकुमार द्वासे यांची नागपूर महापालिकेत सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. चारुशिला पंडित यांची लातूर, 
तर नयना ससाणे यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेत तर संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई पालिका उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात 
आली आहे.

Web Title: New Additional Commissioner in Vasai Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.