वस‌ई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:38 PM2024-03-21T16:38:24+5:302024-03-21T16:38:37+5:30

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली.

Massive fire in Vasai Industrial Estate | वस‌ई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

वस‌ई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईच्या नवघर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भूषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती.

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या शैलेश इंडस्ट्रियल इस्टेट मधील गॉलॅपसिबल ट्यूब कॉर्पोरेशन या खेळणी व ॲल्युमिनियम कोलॅप्सिबल ट्यूब्स, मल्टीलेयर लॅमिनेटेड ट्यूब्स बनवणाऱ्या कंपनीत पसरली. या आगिने काही वेळातच रोद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच नजीकच्या नवघर अग्निशमन उप केंद्राच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आचोळे मुख्य अग्निशमन केंद्र व सनसिटी येथील उपकेंद्रातून पाच वॉटर टॅंकर व पाच फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. संध्याकाळी चार वाजता आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवीण्यात यश आले आहे. 

सदर इंडस्ट्रियल इस्टेट ही राजावली खाडीच्या काठावर असून या ठिकाणी कंपनीचा वेस्टेज कचरा टाकण्यात येतो. बुधवारी देखील या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. ती आग पूर्णपणे विझली नसल्यामुळे ही आग पसरून छापरिया इंडस्ट्रीजला लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन केंद्र अधिकारी विशाल शिर्के, भुपेद्र पाटील, फायरमन नितेश शिरसाठ, कुणाल सामोरे, मिलींद दळवी, दिलीप दांगट व इतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Massive fire in Vasai Industrial Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.