Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

By नितीन काळेल | Published: April 24, 2024 07:28 PM2024-04-24T19:28:56+5:302024-04-24T19:29:31+5:30

प्रशासनाचा अभिनव उपक्रम : मतदारांना आकर्षित करण्यासाठी उचलले पाऊल 

The administration also conducted voting awareness by using boats at Munawale, a water tourism spot in Satara district | Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे जावळी तालुक्यातील मुनावळे या जलपर्यटनस्थळीही प्रशासनाने बोटींचा वापर करुन निवडणुकीची ७ मे ही तारीख आणि १०० टक्के मतदान करणारच अशा संदेशाचा अभिनव उपक्रम राबवून पर्यटक तसेच नागरिकांत जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वीप कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून मुनावळे येथे एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या सहाय्याने लोकांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

कोयना धरणाच्या जलाशयात हा उपक्रम राबविला. यासाठी बोटींचा सहभाग घेण्यात आला. त्यावर मतदानाची तारीख आणि १०० टक्के मतदान करणार असा मजकूर होता. यामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटनासाठी आलेल्या लोकांमध्येही मतदानाचे महत्व पटविण्यात या उपक्रमाचा हातभार लागला. तर यापूर्वी प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मानवी साखळी उपक्रमाचे आयोजन केले होते.

मुनावळे येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, ग्रामसेवक आदींनी प्रयत्न केले. सातारा स्वीप कक्षामधील किरण कांबळे, राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून पर्यटकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचे काम केले.

Web Title: The administration also conducted voting awareness by using boats at Munawale, a water tourism spot in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.