महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 07:00 AM2019-10-23T07:00:00+5:302019-10-23T07:00:02+5:30

Pune Election 2019 : शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Election 2019 : Did the Shiv Sena follow the alliance religion? | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचे दिले आदेश

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा झाली.परंतु,शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.त्यावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचे आदेश दिले.मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरच पुणे शहरातील सेनेच्या कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन केले किंवा नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजप-शिवसेना युतीबाबत संभ्रम असल्याने शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र, युतीचा निर्णय झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न भंगले. पुणे शहरात २०१४ मध्ये भाजपचे आठही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे भाजपकडून पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही.परिणामी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड करून निवडणुक लढण्याचा पवित्रा घेतला. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे पक्षाचा राजीनामा देवून कसबा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले.धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला.त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे समोर आले.
पुणे शहरात शिवसेनेला बळ मिळावे,यासाठी विधानसभेत सेनेचा एकतरी प्रतिनिधी असला पाहिजे, अशी भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या तिकिट वाटपानंतर व्यक्त केली. मात्र, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी भाजप-सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांची समजुत काढली. परिणामी भाजप-शिवसेनेमधील धुसपुस उघडपणे समोर आली नाही. कणकवलीत युतीधर्म पाळला जात नसेल तर पुण्यात युतीधर्म का पाळावा,अशी चर्चा दबक्या आवाजात पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून केली जात होती. कोथरूड विधानसभा मतदार संघातून थेट भाजपचे प्रदेश अध्यक्षच निवडणुक लढवत असल्यामुळे या मतदारसंघात सेनेने प्रामाणीकपणे युतीधर्म पाळला.शहरातील इतर मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर सेनेचे काही कार्यकर्ते दिसत होते.परंतु,लोकसभेच्या वेळी ज्या प्रकारे एकत्रित येवून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले तसे काम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसले नाही,असे बोलले जात आहे.मात्र,निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच युतीधर्माचे पालन झाले किंवा नाही याबाबत चिंतन होईल.
-----------------
पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.मात्र,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार सर्वांनी भाजपसाठी काम केले.तसेच खासदार गिरीश बापट व मी स्वत: नाराज कार्यकर्त्यांची समजुत काढली.त्यामुळे युतीमधील भाजप या मित्रपक्षाच्या उमेदवारांना शिवसेनेने मदत केली.त्यामुळे युतीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल.
- बाळा कदम, संपर्क प्रमुख,शिवसेना,
 

Web Title: Maharashtra Election 2019 : Did the Shiv Sena follow the alliance religion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.