नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका

By नारायण जाधव | Published: April 26, 2024 08:01 PM2024-04-26T20:01:24+5:302024-04-26T20:01:40+5:30

अनधिकृत शाळांची यादी महापालिकेने केली जाहीर

Do not take admission in these five schools in Navi Mumbai | नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका

नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२४ अखेर ५ प्राथमिक शाळा शासनासह नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. यामुळे या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालकेने पालकांना केले आहे.

या पाचही शाळांच्या व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा तत्काळ बंद करावी. अन्यथा आपणाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.

या आहेत त्या पाच शाळा

  1. इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांची अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-८ बी, सी.बी.डी. बेलापूर
  2. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई यांची इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, सेक्टर-२८, नेरूळ
  3. आटपती एज्युकेशन ट्रस्ट, नेरूळ यांची ऑर्किडस् द इंटरनॅशनल स्कुल (CBSE), सीवूड, सेक्टर-४०, नेरूळ.
  4. इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली यांची इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकरनगर, रबाले
  5. मारानाथ संस्थेची शालोम प्रि प्रायमरी स्कुल, शिवशक्तीनगर, शर्मायी मंदिर रोड, तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई.

Web Title: Do not take admission in these five schools in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.