चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 09:18 PM2020-06-18T21:18:33+5:302020-06-18T21:26:08+5:30

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशभरातून चीनचा निषेध होत असून, चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

In protest of China, BJP leaders burned a statue of Kim Jong Un instead of Xi Jinping | चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा

चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा

Next

कोलकाता - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशभरातून चीनचा निषेध होत असून, चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधीलभाजपाच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चा काढून आणि चीनच्या नेत्यांचे पुतळेही जाळले. मात्र पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे चीनचा निषेध म्हणून पुतळा जाळताना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून एक मोठी चूक झाली.

इथे पुतळा जाळण्यासाठी जमलेल्या भाजपा नेत्यांना आपण कुणाचा पुतळा जाळायचा आहे याचीच माहिती नव्हती. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा पुतळा जाळला. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, किम जोंगचा पुतळा जाळणाऱ्यांमध्ये आसनसोल दक्षिण (मंडळ एक) चे भाजपाध्यक्ष गणेश यांनी सांगितले की, आम्ही चीनचा निषेध करत आहोत. लडाखमध्ये जे काही झाले त्याच्या निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आहे. आम्ही चीनचे पंतप्रधान किम जोंग उन याचा पुतळा जाळणार आहोत. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी चिनी सामानाचा उपयोग न करता स्वदेशीचा अवलंब करावा. त्याद्वारे आम्ही चीनला अर्थनीतीद्वारे कमकुवत करण्याचा प्रयत्न करू.  

Web Title: In protest of China, BJP leaders burned a statue of Kim Jong Un instead of Xi Jinping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.