'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 06:07 PM2024-04-26T18:07:38+5:302024-04-26T18:08:31+5:30

'काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही.'

Lok Sabha Election: 'This country will not run on Sharia law, but on UCC...' Home Minister Amit Shah's attack on Congress | 'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज(26 एप्रिल) गुना लोकसभा मतदारसंघात सभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने 70 वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम 370 वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम 370 रद्द केले, असे अमित शहा म्हणाले.

अमित शाह पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर (UCC) चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल.'

'पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. PM मोदींनी देशात 1 कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक 3 कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी 10 वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केली आहे', असंही शहा यावेळी म्हणाले.

Web Title: Lok Sabha Election: 'This country will not run on Sharia law, but on UCC...' Home Minister Amit Shah's attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.