शिक्षक केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले

By मंगेश व्यवहारे | Published: April 16, 2024 05:21 PM2024-04-16T17:21:37+5:302024-04-16T17:23:32+5:30

हजारो सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पेन्शन रखडले आहे.

salary of teacher center head has been stopped for the month of march | शिक्षक केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले

शिक्षक केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले

मंगेश व्यवहारे, नागपूर : एकीकडे निवडणुकीच्या कामावर शिक्षकांना गुंतविली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुक संपन्न होत आहे. पण जिल्ह्यातील ४ हजारच्या आसपास जिल्हा परिषद शिक्षक व केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे नियमित वेतन तसेच हजारो सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पेन्शन रखडले आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करून गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी पूर्वी वेतन देण्याच्या राज्याच्या शिक्षण संचालकांच्या पत्राची अवहेलना करणाऱ्या प्रशासनाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, जिल्हा सचिव मनोज घोडके, देविदास काळाने, संजय नागरे, श्यामराव डोये, वामन मेश्राम, चंद्रकांत मासुरकर, हिरामण तेलंग, प्रदीप दुरगकर,  भावना काळाने इत्यादींनी केली आहे.

Web Title: salary of teacher center head has been stopped for the month of march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.