महिलांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखाेरांना अटक; पाेलिसांचे आवाहन, अफवावर विश्वास ठेवू नका...

By राजकुमार जोंधळे | Published: April 13, 2024 09:19 PM2024-04-13T21:19:52+5:302024-04-13T21:20:02+5:30

लातूरच्या पूर्व भागातील एका घरात तरुण मंडळी घुसून दाेघा महिलांची छेड काढल्याचा प्रकार घडला हाेता. दरम्यान, याचा छडा लावण्यात आला आहे.

Three police officers arrested for harassing women | महिलांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखाेरांना अटक; पाेलिसांचे आवाहन, अफवावर विश्वास ठेवू नका...

महिलांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखाेरांना अटक; पाेलिसांचे आवाहन, अफवावर विश्वास ठेवू नका...

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहराच्या पूर्व भागात गत काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी हातात शस्त्र, ताेंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या टाेळीची अफवा पसरविण्यात आली आहे. या टाेळीचा पाेलिसांनी छडा लावला असून, स्थानिक टवाळखाेरांकडून अशा घटना घडल्याचे समाेर आले आहे. स्थानिक पाेलिसांनी यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याविराेधात विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील पूर्वभागातील नांदेड नाका, गरुड चाैक परिसरासह म्हाडा काॅलनी, महादेव नगर, करीम नगर, प्रबुद्ध नगर, नूरजहाॅ काॅलनी, जय नगर, बरकत नगर, संजय नगर, नाथ नगर आणि इंदिरा नगर भागात जवळपास दाेन आठवड्यांपासून अज्ञात चाेरट्यांची टाेळी हातात धारदार शस्त्र घेवून फिरत असल्याचे समाेर आले. शिवाय, महिलांचे कपडे ब्लेडच्या सहायाने फाडत असल्याची चर्चा सुरु हाेती. या घटनेने स्थानिक नागरिक आणि पाेलिसही चक्रावले हाेते. या प्रकरणाचा पाेलिसांनी छडा लावला असून, काही स्थानिक टवाळखाेर तरुणांकडून असा प्रकार घडल्याचे, अफवा पसरवित दहशत पसरविल्याचे समाेर आले. यातील तिघांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

टवाळखाेरांकडून अफवा पसरविण्याचा प्रकार उघड...

लातूरच्या पूर्व भागातील एका घरात तरुण मंडळी घुसून दाेघा महिलांची छेड काढल्याचा प्रकार घडला हाेता. दरम्यान, याचा छडा लावण्यात आला आहे. घरात घुसून महिलांचे कपडे फाडणे, छेड काढण्याच्या घटना घडत असल्याची अफवा पसरविण्यासाठी हातात शस्त्र घेत, ताेंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचे समाेर आले असून, या अफवा स्थानिक तरुण जाणिवपूर्वक पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही टाेळी स्थानिक असून, ती बाहेरुन आलेली नाही. टाेळीतील तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. काही अडचण असेल तर ‘डायल ११२’ क्रमांकावर संपर्क साधावा.  - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

Web Title: Three police officers arrested for harassing women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.