जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलिस महासंचालक पदक

By विलास बारी | Published: April 25, 2024 10:54 PM2024-04-25T22:54:14+5:302024-04-25T22:55:12+5:30

राज्य शासनाच्या गृह विभागाने या पदकांची घोषणा केली.

director general of police medal awarded to 11 persons of jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलिस महासंचालक पदक

जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलिस महासंचालक पदक

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :पोलिस विभागात काम करीत असताना उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार दि.२५ रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलिस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीणा गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, मोहम्मदअली सत्तारअली सैयद, शकिल अहमद शब्बीर शेख, संजय राजाराम पाटील, राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.

Web Title: director general of police medal awarded to 11 persons of jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस