४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी असताना २०० फुटांची केली प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 07:28 PM2019-01-05T19:28:17+5:302019-01-05T19:30:03+5:30

यावल तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय करता? तालुक्यात २०० फुट खोलीच्या कूपनलिकेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला एवढेही समजत नाही का? अशा शब्दात चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शनिवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना शिवसेना स्टाईलमध्ये शेलकी भाषेत खडे बोल सुनावले.

200 ft proposed to be allowed to dig 400 ft bore | ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी असताना २०० फुटांची केली प्रस्तावित

४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी असताना २०० फुटांची केली प्रस्तावित

googlenewsNext
ठळक मुद्देआढावा बैठकीत आमदार सोनवणेंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणीपाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येत नाही का?दुष्काळ असल्याने कामे लवकर सुरू का झाली नाही?दुष्काळात पाणीटंचाईची कामे या महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना

यावल, जि.जळगाव :  तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय करता? तालुक्यात २०० फुट खोलीच्या कूपनलिकेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला एवढेही समजत नाही का? अशा शब्दात चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शनिवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना शिवसेना स्टाईलमध्ये शेलकी भाषेत खडे बोल सुनावले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील अधिकाºयांना देता आली नाहीत.
शनिवारी सर्व विभागांचा आढावा आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घेतला. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येथील तहसील कार्यालयात शनिवारी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांना तालुक्यात सध्या दुष्काळ असल्याने पाणीटंचाईसंर्दभात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता एस.एम.मोरे यांच्याकडून तालुक्यातील सध्या टंचाईसंदर्भातील आराखडा कसा आहे याबाबत माहिती विचारली असता मोरे यांनी सहा गावात सात कूपनलिका व एकेक विहीर खोेलीकरण मंजूर असल्याचे सांगितले, तेव्हा आमदार प्रा. सोनवणे यांनी या गावात आराखडा तयार करताना कशाप्रकारे निकष लावले? गावात पाण्याची स्थिती कशी? त्या गावात सदरील कामे कधी सुरू होतील, अशी माहिती विचारली असता मोरे यांना उत्तरे देता आली नाही. तेव्हा आमदारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला व दुष्काळ असल्याने कामे लवकर सुरू का झाली नाही? तालुक्यात अजून कोणत्या पेयजल योजना सुरू आहेत व त्यांची सध्याची स्थिती काय? यावरदेखील अधिकारी निरूत्तर झाले. तेव्हा जे कूपनलिकेचे प्रस्ताव पाठवले तेदेखील मोरे यांनी २०० फुटांपर्यंतचे पाठवले तेव्हा २०० फुटांवर पाणी तरी लागेल का, असा प्रश्न आमदारांनी केला, तेव्हा जर २०० फुटांवर पाणी लागणारच नाही, तेव्हा तुम्ही असे प्रस्ताव पाठवताच कशासाठी? असा संतप्त सवाल त्यांनी केला व मंत्रीमहोदयांनी ४०० फुटांची परवानगी दिली आहे, याची साधी माहिती तुम्हाला नाही का? असा सवाल केला. दुष्काळात पाणीटंचाईची कामे या महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना व विहीर अधिग्रहण आवश्यक असल्यास त्याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगीतले.
बैठकीस पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी, गटविकास अधिकारी किशोेर सपकाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता दिलीप मराठे, लागवड अधिकारी प्रज्ञा वडमारे, एसटी आगाराचे एस. व्ही. भालेराव, सूर्यभान पाटील, सेनेचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले, शरद कोळी, गोेटू सोनवणे, आदिवासी सेना प्रमुख हुसेन तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: 200 ft proposed to be allowed to dig 400 ft bore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.