Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 01:32 PM2024-05-06T13:32:04+5:302024-05-06T14:05:28+5:30

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

Rahul Gandhi would overturn Ram Mandir decision like Shah Bano', claims ousted Congress leader Acharya Pramod Krishnam, Lok Sabha Election 2024 | Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि संभलच्या कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशावर प्रेम करणारे लोक या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहेत. जो पंतप्रधानांसोबत नाही, तो देशद्रोही आहे, असे विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "हे धार्मिक युद्ध आहे. जे रामाचे नाहीत, ते राष्ट्राचे होऊ शकत नाहीत. जर या निवडणुकीत ज्या लोकांचे देशावर प्रेम आहे, ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहतील. जे मोदींच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना देशद्रोही म्हटले जाईल." याचबरोबर, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सरकार स्थापन झाल्यास राम मंदिराचा निर्णय मागे घेऊ, असे राहुल म्हणाले होते, असे आचार्य प्रमोद यांनी सांगितले. "राम मंदिराचा निर्णय आल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या एका हितचिंतकाच्या इशाऱ्यावरून म्हणाले होते की, आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही महासत्ता आयोग स्थापन करून राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेऊ. तेव्हा शाहबानोचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो, तर राम मंदिराचा निर्णय का नाही?" असा सवालही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शनिवारी (४ मे) सांगितले की, काँग्रेस लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपाने दोन भागात विभागली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "काँग्रेस पुन्हा दोन गटात विभागली जाईल, एक राहुल गांधींचा गट आणि दुसरा प्रियंका गांधींचा गट असेल." तसेच, राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मला वाटते राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे.

ज्या पद्धतीने राहुल गांधी अमेठी सोडून गेले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "प्रियांका गांधी निवडणूक लढवत नाहीत - हे आता त्यांच्या समर्थकांच्या हृदयात ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे, जो 4 जूननंतर फुटेल." दरम्यान,  काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

Web Title: Rahul Gandhi would overturn Ram Mandir decision like Shah Bano', claims ousted Congress leader Acharya Pramod Krishnam, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.