‘पाहायलाच हवी...’; महाराष्ट्रातील 'ही' अकरा स्थळे बनली ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’

By संतोष हिरेमठ | Published: April 25, 2024 12:51 PM2024-04-25T12:51:32+5:302024-04-25T12:56:09+5:30

छत्रपती संभाजीनगरातील सर्वाधिक वारसास्थळे

'Must see...'; 'These' Eleven Places in Maharashtra Become 'Must See Monuments' | ‘पाहायलाच हवी...’; महाराष्ट्रातील 'ही' अकरा स्थळे बनली ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’

‘पाहायलाच हवी...’; महाराष्ट्रातील 'ही' अकरा स्थळे बनली ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’

छत्रपती संभाजीनगर : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने देशभरातील वारसास्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’ची यादी तयार केली आहे. या यादीत महाराष्ट्रासह देशातील २१ राज्यांमधील महत्त्वाच्या वारसास्थळांची माहिती देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ वारसास्थळे आहेत. या ११ स्थळांमध्ये एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच स्थळे आहेत.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’ची यादीच्या माध्यमातून पर्यटकांना ‘आवर्जून बघाच...’, ‘पाहायलाच हवी...’ असे आवाहन केले आहे. ही यादी एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी या यादीत राज्यातील १० स्थळे होती. आता ही संख्या ११ झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’मध्ये ५ स्थळांना समावेश असणे, हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

राज्यातील २८६ पैकी ११ स्थळे
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाअंतर्गत राज्यातील २८६ स्थळे आहे. या सर्व स्थळांमधील केवळ ११ स्थळे ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’च्या यादीत आली आहेत. https://asimustsee.nic.in/index.php या संकेतस्थळावर ही यादी देण्यात आलेली आहे. याठिकाणी राज्यातील या ११ स्मारकांची सविस्तर माहिती आणि छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. या यादीत महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांमधील महत्त्वाच्या वारसास्थळांची माहिती आहे.

महाराष्ट्रातील ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’...
१) अजिंठा लेणी, छत्रपती संभाजीनगर
२) प्राचिन बुद्धिस्ट स्तूप, मनसर, नागपूर
३) बुद्ध लेणी, छत्रपती संभाजीनगर
४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
५) देवगिरी (दौलताबाद) किल्ला, छत्रपती संभाजीनगर
६) एलिफंटा लेणी, मुंबई
७) वेरूळ लेणी, छत्रपती संभाजीनगर
८) लोणार येथील पंधरा मंदिरे, बुलढाणा
९) गाविलगड किल्ला, चिखलदरा, अमरावती
१०) पांडव लेणी, नाशिक
११) बीबी का मकबरा, छत्रपती संभाजीनगर

Web Title: 'Must see...'; 'These' Eleven Places in Maharashtra Become 'Must See Monuments'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.