रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:53 AM2019-11-20T10:53:39+5:302019-11-20T10:53:46+5:30

रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता आणि सतर्कता बाळगून गळती बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.

Petrol leaks from rail wagons; Passenger alert avoids accident | रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भुसावळ-नागपूर ट्रॅकवरील पश्चिम रेल्वेच्या पानखेडी ते बोरखेडी जात असलेल्या मालवाहू रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती होत असल्याची बाब मंगळवारी दुपारी अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील प्रवाशांच्या लक्षात आली. ही बाब त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता आणि सतर्कता बाळगून गळती बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
पश्चिम रेल्वे विभागाची मालवाहू गाडी पेट्रोलने भरलेले वॅगन मंगळवारी नागपूरकडे जात होती. ही रेल्वेगाडी अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील एफओबीच्या खाली थांबलेली असताना, काही प्रवाशांना वॅगनमधून पेट्रोलची गळती होत असल्याचे दिसले. त्यांनी ही बाब रेल्वे अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली. रेल्वे अधिकाºयांकडून ही बाब रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ )पोलिसांपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण यंत्रणेने घटनास्थळावर धाव घेतली. मालगाडीच्या वॅगनला असलेल्या नळाचे नट फिट कसण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि पेट्रोल गळती थांबली.
पिवळे ‘सील’ नसल्याने संशय
गळती लागलेल्या मालवाहू रेल्वे वॅगनच्या पाइपला पिवळ्या रंगाचे सील नव्हते. हे सील तुटले की तोडले, यावर संशय व्यक्त होत आहे. नागरिक आणि रेल्वे अधिकाºयांची समयसूचकता व सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला.

Web Title: Petrol leaks from rail wagons; Passenger alert avoids accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.