अत्याधुनिक शौचालयांची ‘डिझाइन’ तयार केलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:44 PM2019-11-20T12:44:49+5:302019-11-20T12:44:56+5:30

‘डिझाइन’ तयार न केल्याने शौचालयांचे निर्माण रखडल्याचे चित्र आहे.

Modern toilets design not ready by akola municipal corportion | अत्याधुनिक शौचालयांची ‘डिझाइन’ तयार केलीच नाही!

अत्याधुनिक शौचालयांची ‘डिझाइन’ तयार केलीच नाही!

Next

अकोला: शहरातील बाजारपेठ, गर्दीच्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता द्यावी, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी अनेकदा पाठपुरावा केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता देऊन मनपातील बांधकाम विभागाला शौचालयांची ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिले. या निर्देशाकडे बांधकाम विभागातील ‘त्या’ बेफिकीर अधिकाºयाने सपशेल पाठ फिरविल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ‘डिझाइन’ तयार न केल्याने शौचालयांचे निर्माण रखडल्याचे चित्र आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागातील मुख्य बाजारपेठेत पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया; परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाच्या बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्य बाजारपेठेसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या. जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बांधकाम विभागाला ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिले होते. बांधकाम विभागाच्या कामाचा सतत ‘गजर’ करणाºया ‘त्या’ अधिकाºयाने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे.


मनपामुळे रखडले स्वच्छतागृह
* दुर्गा चौकातील मुख्य नाला
* जवाहर नगर चौक
* सिव्हिल लाइन चौक (जि.प.सर्किट हाउस)
*सिटी कोतवाली चौक, हायड्रंटजवळ
* कोठडी बाजार, मुख्य नाल्याजवळ
* जुना धान्य बाजार
* गांधी चौक, जैन मंदिरालगत
* टिळक रोड, आकार डेव्हलपर्सजवळ
* जयहिंद चौक, जि.प. उर्दू शाळेचे आवार
* मंगरूळपीर रोड, क्लासिक बारजवळील नाला.


महापौर साहेब, हे चाललंय काय?
महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या कार्यकाळात स्वच्छतागृहांअभावी सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शौचालयांचे ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिल्यानंतरही मनपाचा बांधकाम विभाग काम करण्यास तयार नसेल तर महापौर साहेब, या विभागातील मस्तवाल अधिकारी-कर्मचाºयांचा तुम्ही बंदोबस्त करणार का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Modern toilets design not ready by akola municipal corportion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.