उल्हासनगरात पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा, सुभाष टेकडी परिसरात पाण्यासाठी वणवण

By सदानंद नाईक | Published: March 27, 2024 06:29 PM2024-03-27T18:29:43+5:302024-03-27T18:29:52+5:30

 उल्हासनगर पूर्व सुभाष टेकडी येथील दहा चाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, डिफेन्स कॉलनी आदी परिसरात गेल्या आठवड्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली.

Women march to protest water shortage in Ulhasnagar | उल्हासनगरात पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा, सुभाष टेकडी परिसरात पाण्यासाठी वणवण

उल्हासनगरात पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा, सुभाष टेकडी परिसरात पाण्यासाठी वणवण

सदानंद नाईक

 उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी येथील दहाचाळ, कुर्ला कॅम्प परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी मोर्चा काढला. भुयारी गटार योजनेत पाणी सोडण्याचा वॉल गाडला गेल्याने, पाणी टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगर पूर्व सुभाष टेकडी येथील दहा चाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, डिफेन्स कॉलनी आदी परिसरात गेल्या आठवड्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी टंचाईमुळे महिलांना एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली होती. अखेर संतप्त महिलांनी एकत्र येत मंगळवारी दहा चाळ येथून नेताजी चौक उपअभियंता पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढला. महापालिका संबंधित अधिकाऱ्यांना पाणी टंचाई बाबत माहिती देऊन जाब विचारला. अखेर पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांना दिल्यावर महिला शांत झाल्या आहेत.

Web Title: Women march to protest water shortage in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.