उल्हासनगर महापालिका आयुक्तांची निवडणूक आचारसंहितेबाबत बैठक 

By सदानंद नाईक | Published: March 27, 2024 08:20 PM2024-03-27T20:20:18+5:302024-03-27T20:20:40+5:30

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याचे आदेश.

Ulhasnagar Municipal Commissioner's meeting regarding election code of conduct | उल्हासनगर महापालिका आयुक्तांची निवडणूक आचारसंहितेबाबत बैठक 

उल्हासनगर महापालिका आयुक्तांची निवडणूक आचारसंहितेबाबत बैठक 

उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभागृहात निवडणूक आदर्श आचारसंहिता बाबत आयुक्त अजित शेख यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आचारसंहितेबाबत आयुक्तांनी सूचना देऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे आदेश दिले आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी निवडणूक आदर्श आचारसंहिता बाबत बैठक घेऊन विविध सूचना देऊन पालन करण्याचे आदेश दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. याव्यतिरिक्त भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे बांधकाम विभागाला दिले. शहरात लावण्यात आलेले अवैध पोस्टर्स, बॅनर्स, होर्डीग्ज आदिवरही कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिले आहे. 

महापालिकेने निवडणूक आचारसंहितावेळी चुकीने काही कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या निविदा आयुक्तांनी रद्द करण्याचे आदेश बैठकीत बांधकाम विभागाचे शहर अभियंता संदीप जाधव यांना दिले. आर्थिक वर्ष संपत आल्याने मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्याच्या सुचना मालमत्ताकर विभागाला देऊन शहरात वाढलेल्या धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी मारण्याचे संबंधित अधिकाऱ्याला सुचविले. याबाबत पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यासाठी नगररचना विभागाला सुचित केल्या आहेत. बैठकीला उपायुक्त संजय गवस, सहायक नगररचना संचालक ललीत खोब्रागडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, श्रद्धा बाविस्कर, दिप्ती पवार, विनोद केने, मनीष हिवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ulhasnagar Municipal Commissioner's meeting regarding election code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.