पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

By सुरेश लोखंडे | Published: April 23, 2024 06:46 PM2024-04-23T18:46:46+5:302024-04-23T18:47:04+5:30

खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली.

During the monsoon, the emphasis will be on the growth of Sonchafa, Mogra, Jambhul, Fanas! | पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

ठाणे : जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन वार्डावणेसाठी सुधारीत वाणांसोबतच संकरित वाण वापरण्यासाठी शेतकऱ्यांमधे जनजागृती करून यंदाच्या पावसाळ्यात सोनचाफा व मोगरा या फुलपिकांचे तसेच जांभुळ व फणस या फळपिकांचे क्षेत्र विस्तारावर भर द्या, असे ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मार्गदर्शन करून कृषी व कृषी संलग्न खरीप पूर्व हंगामाच्या नियाेजनाचा आढावा त्यांनी आज घेतला.   

खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) छाया शिसोदे, अतिरिक्त साईओ डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदीं अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हयातील प्रमुख पिकांचे तसेच पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी संबंधित निविष्ठा पुरवठादारांना शिनगारे यांनी निर्देश दिले.

 बियाणे व खतांच्या गुणनियंत्रणासाठी वेळेवर नमुने काढुन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांकडुन प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करा,भात पिकाचे उत्पादन वार्डावणेसाठी सुधारीत वाणांसोबतच संकरित वाण वापरणेबाबत शेतक-यांमधे जनजागृती करणेच्या सुचना दिल्या. तसेच भात पिकाच्या शाश्वत उत्पादन वाढीकरीता सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT) पद्धतीचा जास्तीत जास्त क्षेत्रावर अवलंब करावा, शाश्वत उत्पादन व विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी या बैठकी मार्गदर्शन करण्यात आल.

तर बांबु लागवड पर्यावरण पुरक असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबु लागवड करा. सोनचाफा व मोगरा या फुलपिकांचे, जांभुळ व फणस या फळपिकांचे क्षेत्र विस्तारावर भर द्या, विविध राष्ट्रीयकृत, ग्रामीण सहकारी बँकांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व संबंधित बैंक प्रतिनिधी यांना शिनगारे यांनी दिले.

Web Title: During the monsoon, the emphasis will be on the growth of Sonchafa, Mogra, Jambhul, Fanas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.