ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

By अजित मांडके | Published: April 23, 2024 02:45 PM2024-04-23T14:45:53+5:302024-04-23T14:46:05+5:30

विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे.

330 Crores 28 Lakhs were paid by the Thane Excise Department to the state treasury | ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

ठाणे : अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे ३३० कोटी २८ लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत आहे.

राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोता पैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. राज्य सरकारचा महसुल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयाने भरीव कामगिरी आहे. यामध्ये ठाणे विभागाने आर्थिक वर्षात सुमारे ३३०.३० कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ३२६ कोटी रुपये जमा केले होते. या आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला आहे. दारूची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क ) अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून, या वर्षात ३३o कोटी २८ लाखांचा  महसूल जमा झाला आहे.

अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीने दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे  सरळ मार्गी दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतो. मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते. याचा परिणाम गेल्या वर्षी पेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले.
- डॉ. निलेश सांगडे (राज्य उत्पादन शुल्क ठाणे जिल्हा अधीक्षक)

Web Title: 330 Crores 28 Lakhs were paid by the Thane Excise Department to the state treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे