राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; जाणून घ्या नेमकं कारण

By Appasaheb.patil | Published: March 27, 2024 07:07 PM2024-03-27T19:07:54+5:302024-03-27T19:08:42+5:30

अशा संधीसाधू राजकारण्यांच्या विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही असेही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

Vadar Samaj in state to boycott Lok Sabha elections; Know the real reason | राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; जाणून घ्या नेमकं कारण

राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; जाणून घ्या नेमकं कारण

सोलापूर - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती. राज्यात समाजाची लोकसंख्या ८० लाखापेक्षाही जास्त आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाचे निर्णायक मते आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने' मी वडार महाराष्ट्राचा 'या संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेव्दारे दिला आहे. 

दरम्यान, सोलापूर येथे २०१८ मध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. फडणवीस यांनी वडार समाजाला एस.टी प्रवर्गात समावेश करु, समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करु, समाजातील तरुणांना रोजगार देऊ, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वसतिगृह सुरु करु, मजूर सोसायट्यांना दहा टक्के कामे आरक्षित ठेऊ, तरुणांनी उ‌द्योग व्यवसाय करावा म्हणून पैलवान मारुती चव्हाण - वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू यासह आदी विविध घोषणा व आश्वासने देण्यात आली होती. सत्ताधार्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊन वडार समाजाचा केवळ मतासाठीच वापर केला आहे. सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे अशा संधीसाधू राजकारण्यांच्या विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही असेही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल साळुंके, शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, सचिव अनिल चौगुले, सुनील शिंदे, माजी नगरसेवक विनायक विटकर, नगरसेविका प्रतिभा मुदगल, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक संजय साळुंखे, खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Vadar Samaj in state to boycott Lok Sabha elections; Know the real reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.