Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

By राकेश कदम | Published: April 24, 2024 12:02 PM2024-04-24T12:02:51+5:302024-04-24T12:03:56+5:30

Solapur News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

Solapur: Former Mayor of Saleapur Mahesh Kothe shocked, nephew Devendra Kothe in BJP, event held in Nagpur | Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

- राकेश कदम
साेलापूर - राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या प्रवेशातून भाजपने शहर उत्तर आणि शहर मध्य मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

माजी महापाैर महेश काेठे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यांचे पुतणे देवेंद्र यांनी मात्र वेगळा मार्ग स्वीकारला. देवेंद्र काेठे हे माजी नगरसेवक आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले हाेते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा हाेत्या. अखेर नागपूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे साेलापूर लाेकसभा प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापाैर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित हाेते. भाजपची ध्येय धाेरणे आवडल्यामुळे आपण पक्ष प्रवेश केला. आता भाजपचे साेलापूर लाेकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय हाेणार असल्याचे काेठे यांनी सांगितले.

Web Title: Solapur: Former Mayor of Saleapur Mahesh Kothe shocked, nephew Devendra Kothe in BJP, event held in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.