या फोटोत लपवलं आहे एक कॅक्टसचं झाड, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:44 PM2024-05-09T16:44:29+5:302024-05-09T16:45:25+5:30

Optical Illusion : या फोटोतील कॅक्टस केवळ 1 टक्के लोकच शोधू शकले आहेत. त्याला शोधण्यासाठी तुमच्याकड 9 सेकंदाची वेळ आहे. 

Optical Illusion : Can you see hidden cactus in this photo only sharp minds can solve within 9 seconds | या फोटोत लपवलं आहे एक कॅक्टसचं झाड, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधून दाखवा!

या फोटोत लपवलं आहे एक कॅक्टसचं झाड, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधून दाखवा!

Optical Illusion : झाडांची सगळ्यांनाच आवड असते. बरेच लोक आपल्या घराच्या बागेत, बाल्कनीत झाडे लावतात. बऱ्याच लोकांना झाडांची खूप पारखही असते. तुम्हालाही झाडांची पारख असेल तर खूपसाऱ्या झाडांमध्ये तुम्हाला कॅक्टस शोधायचं आहे. पण हे काम इतकंही सोपं नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. असा दावा केला जातो की, या फोटोतील कॅक्टस केवळ 1 टक्के लोकच शोधू शकले आहेत. त्याला शोधण्यासाठी तुमच्याकड 9 सेकंदाची वेळ आहे. 

सोशल मीडियावर नेहमीच ब्रेन टीजर, ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. ज्यांमध्ये तुम्हाला काहीना काही शोधायचं असतं किंवा त्यांमधील फरक शोधायचे असतात. आज आम्ही आणलेल्या फोटोत तुम्हाला कॅक्टस शोधायचं आहे. हा फोटो टोम्बोला वेबसाइट (Tombola.co.uk) ने डिझाइन केला आहे.

फोटोत तुम्ही बघू शकता की, फुलाच्या दुकानावर काम करणारी एक तरूणी दिसत आहे. तिथे एक मांजरही बसलेली दिसत आहे. काही झाडी फार चांगल्या पद्धतीने ठेवली आहे. यात एक कॅक्टसचं झाड आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. फोटोत खूपसारे झाडं दिसत आहेत त्यात एक कॅक्टसचं झाड आहे. त्यामुळे ते शोधणं काही सोपं काम नाही. 

जर तुम्हाला 9 सेकंदात यातील कॅक्टसचं झाड दिसलं तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही कॅक्टसचं झाड दिसलं नाही तर निराश होऊ नका. ते कुठे आहे हे खालच्या फोटोत बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you see hidden cactus in this photo only sharp minds can solve within 9 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.