मोमो शॉपमध्ये आहे मदतनीसाची गरज, पगाराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; Viral जाहिरात चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:52 PM2024-04-10T15:52:13+5:302024-04-10T15:54:39+5:30

अलिकडेच एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका नोकरीच्या जाहिरातीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

a viral advertisement of momo shop for helper job users getting shocked while see the advertisement | मोमो शॉपमध्ये आहे मदतनीसाची गरज, पगाराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; Viral जाहिरात चर्चेत

मोमो शॉपमध्ये आहे मदतनीसाची गरज, पगाराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; Viral जाहिरात चर्चेत

Social Viral : सर्वसाधारणपणे कोणत्याही तरूणाची आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर उत्तम पगारासह एका कंपनीत नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असते. परंतु आपल्या आजुबाजूला तुम्हाला असे काही मोजकेच लोक सापडतील ज्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम मिळालं. काहींना तर मोठ-मोठ्या कॉलेजेसमधून पदवी मिळवून शिवाय अव्वाच्यासव्वा फीस भरूनही त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे स्वत: सह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेत ते काम करण्याची तरूण पसंती दर्शवतात.

दरम्यान, एक्स व्हायरल होणाऱ्या एका नोकरीच्या जाहिरातीने असंख्य तरुणांसह अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या व्हायरल फोटोमध्ये एका मोमो शॉपमध्ये नोकरीची संधी असल्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. अमृता सिंह  @puttboy25 नावाच्या एका एक्स अकाउंटवरून ही जाहिरात पोस्ट केली आहे. पण जाहिरातीपेक्षा त्यामध्ये सहाय्यक कर्मचाऱ्याच्या पदासाठी  भरती असल्याचं सांगण्यात आलंय. या रिक्त पदासाठी मोमो शॉपच्या मालकाकडून नोकरदाराला तब्बल २५,००० इतका पगार देण्यात येईल असं नमूद करण्यात आलं आहे. 

मोमो शॉपकडून ऑफर करण्यात आलेली जाहिरात पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. तर काहींनी या व्हायरल पोस्टवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ''या पदासाठी अर्ज करणं कोणालाही आवडेल''. तसेच ''असं वाटतंय की इंटरनेट 'Pay Package'  ला वाचवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागतेय'' अशी खोचक प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्याने केली आहे.

Web Title: a viral advertisement of momo shop for helper job users getting shocked while see the advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.