Satara: लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष बदल; सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती 

By नितीन काळेल | Published: March 27, 2024 12:56 PM2024-03-27T12:56:47+5:302024-03-27T12:57:11+5:30

राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून वाई तालुक्यातील अल्पना यादव कार्यरत होत्या.

Congress Women District President Change in Lok Sabha Elections; Appointment of Sushma Rajeghorpade | Satara: लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष बदल; सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती 

Satara: लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष बदल; सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती 

सातारा : लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असतानाच राष्ट्रीय काँग्रेसच्यामहिला जिल्हाध्यक्षात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश महिलाकाँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्या जागी सुषमा राजेघोरपडे यांची आता नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून वाई तालुक्यातील अल्पना यादव कार्यरत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन वर्षांत त्यांनी महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी जिल्हाभर कार्यक्रम घेतले. तसेच साताऱ्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीतही महिलांसाठी मेळावे घेतले. मात्र, लोकसभा निवडणूक सुरू असतानाच त्यांच्या जागी सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी राजेघोरपडे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. राजेघोरपडे या सातारा तालुक्यातील नांदगावच्या आहेत. स्वातंत्र्यसैनिक व साताऱ्याचे माजी आमदार दिवंगत बाबूराव घोरपडे यांचे लहान बंधू आणि स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण घोरपडे यांच्या त्या नात सून आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना जिल्हा उपाध्यक्षपद मिळाले होते. तर सध्या काँग्रेसच्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होत्या. या नियुक्तीबद्दल त्यांचे माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई आदींनी स्वागत केले.

Web Title: Congress Women District President Change in Lok Sabha Elections; Appointment of Sushma Rajeghorpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.