सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

By नितीन काळेल | Published: May 7, 2024 10:20 AM2024-05-07T10:20:28+5:302024-05-07T10:20:34+5:30

 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत.

7 percent polling in first two hours for Satara Lok Sabha | सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

नितीन काळेल 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असून पहिल्या दोन तासात सरासरी ७ टक्के मतदान झाले. तर या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या. 

 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते ९ या दोन तासात मतदारसंघात सरासरी ७ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: 7 percent polling in first two hours for Satara Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.