कोकण रेल्वे मार्गावर येत्या गुरुवारी तीन तासांचा मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

By शोभना कांबळे | Published: April 16, 2024 03:56 PM2024-04-16T15:56:00+5:302024-04-16T16:10:13+5:30

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली माहिती

A three hour megablock on the Konkan railway line on Thursday | कोकण रेल्वे मार्गावर येत्या गुरुवारी तीन तासांचा मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

कोकण रेल्वे मार्गावर येत्या गुरुवारी तीन तासांचा मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पूर्वनियोजित मेगा ब्लॉक घेतला जात आहे. या कारणास्तव गुरूवार, दि. १८ रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र, या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पूर्वनियोजित मेगा ब्लॉक घेतला जात आहे. येत्या गुरूवारी (१८ रोजी) मडगाव ते कुमटा या सेक्शन दरम्यान दुपारी बारा वाजून दहा मिनिटे ते तीन वाजेपर्यंत तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे याचा परिणाम दोन विशेष गाड्यांच्या वेळांवर होणार आहे.

मंगळूर सेंट्रल ते मडगाव (गाडी क्रमांक ०६६०२) ही १८ रोजी एप्रिल रोजी धावणारी गाडी मडगावपर्यंत न जाता कारवार पर्यंत नेण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासात कारवार येथूनच ही गाडी (क्रमांक ०६६०१) परत मंगळूरूपर्यंत चालवली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील या मेगा ब्लाॅकमुळे कारवार ते मडगाव पर्यंतचा या गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली आहे.

Web Title: A three hour megablock on the Konkan railway line on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.