धुळवडीच्या सोंगानी केली नागरीकांची करमणूक; चिमुकल्यांसह आबाल वृध्दांनी मात्र ही प्रथा कायम राखली

By निखिल म्हात्रे | Published: March 26, 2024 06:25 PM2024-03-26T18:25:31+5:302024-03-26T18:26:05+5:30

पाच दिवस चालणाऱ्या शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. होळीपासून रंगपंचमीपर्यत विविध खेळ व सोंग काढण्याची प्रथा रूढ होती.

Songani of Dhulwadi entertained the citizens | धुळवडीच्या सोंगानी केली नागरीकांची करमणूक; चिमुकल्यांसह आबाल वृध्दांनी मात्र ही प्रथा कायम राखली

धुळवडीच्या सोंगानी केली नागरीकांची करमणूक; चिमुकल्यांसह आबाल वृध्दांनी मात्र ही प्रथा कायम राखली

अलिबाग : धुळवडीच्यानिमित्ताने अलिबाग तालुक्यात लहानग्यांपासून आबलवृध्दांनी शिमग्याची सोंग सोमवारी रात्री काढली. यामध्ये काहीजणांनी पौराणिक कथांवर तर, काहींनी पारंपारीक संस्कृती तर काहींनी जंगली प्राणी, भुतनाथ, टिव्ही सिरीयलमधील पात्रांच्या वेशभूषा करीत करमणूक केली होती.शिमग्याचा सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासणाला धुलिवंदना दिवशीची सोंग काढण्याची परंपरा काळानुरुप लोप पावत असली तरी अलिबाग कोळीवाडा, वरसोली, रायवाडी येथील चिमुकल्यांसह आबाल वृध्दांनी मात्र ही प्रथा कायम राखली आहे.

पाच दिवस चालणाऱ्या शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. होळीपासून रंगपंचमीपर्यत विविध खेळ व सोंग काढण्याची प्रथा रूढ होती. पूर्वी मनोरंजनाची साधन कमी असल्याने सण -उत्सव यात्रा काळात आनंदोत्सव साजरे करताना ऐतिहासिक पौराणिक विनोदी प्रसंगातून विविध रूपात अबालवृद्धसोंग काढुन रात्रभर गावाच्या मुख्य चौकात किंवा चावडीवर गावकऱ्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत. परंतु सध्या आधुनिक अन् ऑनलाईनच्या जमान्यात वाढलेल्या इंटरनेट हस्तक्षेपाने मुलांसह प्रौढवर्गाला खीळवून ठेवले आहे.

लोप पावत चाललेली संस्कृती पुन्हा सुरु व्हावी अशी आम्हा महीलांची इच्छा होती. मागील चार दिवसापासून आम्ही साऱ्याजणी पालखीची तयारी करीत होतो. पालखी काढताना पालखीत असलेला जमाव थांबबाबवा होणतीही आणीबाणी होऊन नये म्हणून आम्ही पोलिस वेशभुषा करीत सार चित्र मांडण्याचा प्रयत्न केले आहे.
- सुनिता वार्डे, कलाकार.

Web Title: Songani of Dhulwadi entertained the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.