पत्नी नांदायला घरी येईना; पोलिस चौकीतच पतीने स्वत:वर ओतले पेट्रोल, आत्महत्येचा प्रयत्न

By भाग्यश्री गिलडा | Published: May 2, 2024 04:40 PM2024-05-02T16:40:34+5:302024-05-02T16:42:41+5:30

हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी साडेबारा महात्मा फुले पोलिस चौकीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला आहे...

Wife does not come home to live husband ended by pouring petrol on himself at the police post itself | पत्नी नांदायला घरी येईना; पोलिस चौकीतच पतीने स्वत:वर ओतले पेट्रोल, आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी नांदायला घरी येईना; पोलिस चौकीतच पतीने स्वत:वर ओतले पेट्रोल, आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलीस शिपाई मुकेश अशोक पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेलरोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१) दुपारी साडेबारा महात्मा फुले पोलिस चौकीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला आहे. किरकोळ वादातून नवनाथची पत्नी त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. नवनाथ याने तिला नांदण्यास येण्यासाठी सांगितले, मात्र ती नांदायला येण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून बुधवारी (दि. १) सकाळी याचा जाब विचारण्यासाठी तो सासुरवाडीला गेला होता. मात्र, घरी कोणी नसल्याने त्याने पत्नीला फोन करून विचारले असता तिने महात्मा फुले पोलिस चौकीत असल्याचे नवनाथला सांगितले.

नवनाथ पोलिस चौकीमध्ये दाखल झाला. पोलिस चौकीत जाताने त्याने एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल नेले होते. त्याठिकाणी झालेल्या वादातून नवनाथने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिस चौकीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नवनाथला अडवले आणि मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Wife does not come home to live husband ended by pouring petrol on himself at the police post itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.