लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

By नितीश गोवंडे | Published: May 4, 2024 04:19 PM2024-05-04T16:19:23+5:302024-05-04T16:20:38+5:30

हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी घडला आहे....

Rape of minor girl friend by luring her for marriage; The type is revealed after the girl becomes pregnant | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी घडला आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि. ४) उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून १७ वर्षीय मुलावर बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच बिल्डिंगमध्ये राहत असून, ते एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने पीडितेच्या घरात कोणी नसताना घरी येऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.

Web Title: Rape of minor girl friend by luring her for marriage; The type is revealed after the girl becomes pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.