"खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार..." पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा

By अजित घस्ते | Published: May 6, 2024 07:47 PM2024-05-06T19:47:35+5:302024-05-06T19:48:42+5:30

एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.....

MIM candidate Anis Sundke will build a grand monument of Tipu Sultan after becoming MP | "खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार..." पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा

"खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार..." पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा

पुणे :पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, बेरोजगारी यांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी पुणे शहराचा खासदार झाल्यावर पुणेकर नागरिकांना सर्व समस्यांमधून मुक्त करणार आहे. तसेच, देशभरात विविध महान व्यक्तींची स्मारके आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्येक स्मारक प्रेरणा देत आले आहेत. त्यामुळे मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचे कार्य लक्षात घेऊन टिपू सुलतान यांचे भव्य असे स्मारक उभारणार असल्याचे एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

तसेच, मूळ वक्फ बोर्डाची मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी शहर अभियंता यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस मुंडके यांनी पत्रकार परिषदेत केला. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून, आता खासगी विकासक उत्कर्ष असोसिएट्सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी इमारत बांधली आहे, असेही सुंडके यांनी नमूद केले.

Web Title: MIM candidate Anis Sundke will build a grand monument of Tipu Sultan after becoming MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.