बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता टोळ यांचे निधन

By श्रीकिशन काळे | Published: April 19, 2024 07:37 PM2024-04-19T19:37:07+5:302024-04-19T19:37:07+5:30

ते २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते...

Former president of Balkumar Sahitya Sammelan passed away | बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता टोळ यांचे निधन

बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता टोळ यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ (८९) यांचे पुण्यात शुक्रवारी निधन झाले. ते खासकरून लहान मुलांसाठी लेखन करत असत. त्यांनी अमरेंद्र दत्त असे टोपण नाव वापरून लेखन केले. ते २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. तसेच नातू फाउंडेशनचेही विश्वस्त होते.  

मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी दत्ता टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली होती. गुरूचे आणि स्वत:चे पहिले नाव एकत्र करून ‘अमरेंद्र दत्त’ या नावाने त्यांचे साहित्य प्रकाशित केले. अमरेंद्र गाडगीळ या आपल्या गुरूंच्या स्मृती जपल्या जाव्यात तसेच, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टोळ यांनी हा निर्णय घेतला होता.

टोळ विपुल साहित्य प्रसिध्द आहे. अंक मोजू या, अच्च्या अन्‌ बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक मन एक रूप (पुरस्कारप्राप्त पुस्तक), एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा (कथासंग्रह), ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट (कादंबरी, सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जय मृत्युंजय, जादूची करामत, जादू संपली (कादंबरी), जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे (प्रौढांसाठी एकांकिका), मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज (सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव (एकांकिका), सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय ही त्यांची पुस्तक संपदा प्रसिध्द झाली आहे.

Web Title: Former president of Balkumar Sahitya Sammelan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.