उकाड्यापासून पुणेकरांना थोडाफार दिलासा! तरीही दुपारी घराबाहेर पडू नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन

By श्रीकिशन काळे | Published: April 19, 2024 03:30 PM2024-04-19T15:30:32+5:302024-04-19T15:31:21+5:30

आज तापमानाचा पारा जरासा खाली आल्याने उकाडा कमी जाणवतोय

A little relief for Pune residents from the heat However do not step out of the house in the afternoon, the meteorologist appeals | उकाड्यापासून पुणेकरांना थोडाफार दिलासा! तरीही दुपारी घराबाहेर पडू नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन

उकाड्यापासून पुणेकरांना थोडाफार दिलासा! तरीही दुपारी घराबाहेर पडू नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणेकरांना उष्णतेमुळे प्रचंड उकाडा सहन करावा लागला. गुरूवारी (दि.१८) उच्चांकी ४३ तापमानाची नोंद झाली. पण आज मात्र तापमानाचा पारा जरासा खाली आला असून, त्यामुळे उकाडा कमी जाणवत आहे. तरी देखील दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. तसेच आज उष्णतेची लाट जाणवणार नाही आणि सायंकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असाही अंदाज दिला आहे.

शहरात गुरूवारी (दि.१८) शिवाजीनगरला ४१ आणि वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर या ठिकाणी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने पुणेकरांच्या अंगाची लाही लाही झाली. आज (दि.१९) पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला असून, तापमान ४० अंशावर आले आहे. आजपासून कमाल तापमानात घट होऊन उकाडा कमी जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. आज किमान तापमान हडपसरला २८, मगरपट्टा २७.६, वडगावशेरीला २७.५ आणि कोरेगाव पार्कला २७.१ नोंदले गेले आहे. तर शिवाजीनगरला २४.७ अंशावर तापमान नोंदले गेले.

Web Title: A little relief for Pune residents from the heat However do not step out of the house in the afternoon, the meteorologist appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.