शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:48 AM

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याची सीबीआयकडून लवकरच चौकशी होण्याची शक्यता

पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे इथल्या मालमत्तांवर सीबीआयचं छापासत्र सुरू आहे. देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावाअनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेली कारवाई कायदेशीर असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. काही जण जात्यात आहेत. तर काही जण सुपात आहेत, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं. 'सीबीआयकडून कायदेशीर कारवाई सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय कारवाई करतेय. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपचं कारस्थान म्हटलं. त्यांचा आरोप हास्यास्पद आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आधी परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं. आता उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयची कारवाई सुरू आहे. काही जण जात्यात आहेत. काही जण सुपात आहेत. सगळ्यांचा हिशोब परमेश्वर करत असतो,' असं पाटील यांनी म्हटलं.अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली. देशमुख यांची सीबीआय चौकशी होते. त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल होतो. त्यांच्या मालमत्तांवर धाडी पडतात. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी मला मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांना धमकावून त्यांच्याकडून १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप वाझेनं कागदोपत्री केला आहे. त्यामुळे परब यांची चौकशी व्हायला हवी, असं पाटील म्हणाले.अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल, १० मालमत्तांवर सीबीआयची धाड; अडचणी वाढणार

भाजप नेते किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावाअनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. 'सचिन वाझे २००० कोटींची वसुली गँग प्रकरणात आता अनिल देशमुखांवर कारवाई होतेय. मंत्री अनिल परब यांचीही थोड्या दिवसात हीच स्थिती होईल. आणखी २ मोठे नेते लाभार्थी आहेत. २ हजार कोटी गोळा झाले. ते कुठे कुठे गेले? आता सीबीआय कारवाई करतेय. ईडी तपास करतेय. एनआयए आहे. पुढील काही दिवसांत आयकर विभागदेखील येईल. उद्धव ठाकरेंना २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल,' असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सीबीआयच्या कारवाईला वेगसीबीआयकडून सुरू असलेली अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी काल पूर्ण झाली. त्यानंतर आज देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला १५ दिवसांचा कालावधी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं देशमुख आणि इतरांची चौकशी सुरू केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा