मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 24, 2024 01:06 PM2024-04-24T13:06:24+5:302024-04-24T13:06:38+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट...

Three-way fight in Maval Lok Sabha constituency? An application was filed by Madhuri Joshi of Vanchit Bahujan Aghadi | मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

पिंपरी : वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांनी बुधवारी (दि.२४) मावळमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्जत येथील माधवी जोशी या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी शनिवारी वंचितमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली.

महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे.

Web Title: Three-way fight in Maval Lok Sabha constituency? An application was filed by Madhuri Joshi of Vanchit Bahujan Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.