रहाटणीत दुचाकीवरून पाठलाग करून गाठलं; चाकू, कोयत्याने वार करून गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून

By नारायण बडगुजर | Published: May 2, 2024 03:34 PM2024-05-02T15:34:13+5:302024-05-02T15:34:41+5:30

रहाटणी येथे औंध - रावेत मार्गावरील पुलावर बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली...

Chased 'him' on a bike in Rahatni; Brutally murdering the criminal by stabbing him with a knife | रहाटणीत दुचाकीवरून पाठलाग करून गाठलं; चाकू, कोयत्याने वार करून गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून

रहाटणीत दुचाकीवरून पाठलाग करून गाठलं; चाकू, कोयत्याने वार करून गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून

पिंपरी : टोळक्याने दुचाकीवरून पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला अडवले. त्यानंतर चाकू आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. रहाटणी येथे औंध - रावेत मार्गावरील पुलावर बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

रेहान अरिफ शेख (१९, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, दीपक कोकाटे आणि इतर अनोळखी चार संशयित व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेजस मनोहर हंसकर (१८, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस हे त्यांचा मित्र रेहान शेख आणि हर्षद काटे यांच्यासोबत दुचाकीवरून औंध - रावेत मार्गावरून रावेतच्या दिशेला जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. तीन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी फिर्यादी तेजस आणि रेहान यांचा रस्ता अडवून सर्वांनी घेराव घातला. त्रुानंतर ऋतिक चव्हाण याने चाकूने रेहान शेख याच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. तसेच त्याच्या सोबत असलेल्या दीपक कोकाटे याने कोयत्याने रेहान याच्या मानेवर वार करून त्याला जिवे ठार मारले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेहान शेख याच्यावर पिंपरी -चिंचवड पोलिसांकडे वेगवेगळे गुन्हे आहेत.

Web Title: Chased 'him' on a bike in Rahatni; Brutally murdering the criminal by stabbing him with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.