लोकसभा निवडणुकांच्या गडबडीत धनंजय महाडिकांच्या लेकाच्या लग्नाची धामधुम, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:55 PM2024-05-06T17:55:43+5:302024-05-06T18:06:59+5:30

भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेक विश्वराज महाडिक आणि मंजिरी पाटील यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेक विश्वराज महाडिक आणि मंजिरी पाटील यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ५ मेला त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधुम आणि प्रचाराची लगबग सुरू असताना धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राने लग्नगाठ बांधत नव्या आयु्ष्याला सुरुवात केली आहे.

विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. तर महायुतीतील अनेक नेत्यांनी लग्नाला उपस्थित राहून या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

विश्वराज महाडिक वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.

खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूरातील महत्वाचे राजकारणी आहेत. साखर आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात त्यांचं नाव आहे. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्यांचा एक सहकारी साखर कारखाना आहे.

२०१९ मध्ये धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्याआधी २०१४-२०१९मध्ये ते राष्ट्रवादीचे खासदार होते. आता ते भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत.

त्यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत. महाडिकांची तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे.

धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.