'लिंबू कलर'वाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता समुद्रावरील फोटो व्हायरल झालेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 09:38 AM2019-09-15T09:38:46+5:302019-09-15T09:46:32+5:30

लोकसभा निवडणूक होऊन चार महिने उलटून गेलेत. या काळात अनेक मुद्दे व्हायरल झाले होते. याचबरोबर एका पोलिंग ऑफिसर महिलेचे फोटोही कमालीचे व्हायरल झाले होते. अहो, बरोबर...तीच ती...लिंबू कलरच्या साडीमधली रीना द्विवेदी.

आज पुन्हा आठवण येण्याचे कारण म्हणजे तिचे आणखी काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

आधी या महिलेचे नाव नलीनी सिंह असल्याचे व्हायरल झाले होते. पण नंतर खुलासा झाला. या महिला अधिकाऱ्याच्या फोटोंना हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत. फेसबुकचं नाही तर हे फोटो हॉट्सअ‍ॅपवरही व्हायरल झाले आहेत.

तर रीना द्विवेदी यांचे काही समुद्रावरील फोटो व्हायरल होत आहेत, तर काही स्कर्टमधील.

ही महिला अधिकारी लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे. निवडणुकी आधी एका पत्रकाराने काढलेले फोटो एवढे व्हायरल झालेत की रस्त्याने जातानाही लोक थांबवून त्यांच्या सोबत सेल्फी काढून घेत आहेत.

महत्वाचे म्हणजे रीना त्यांना हसतमुखाने सेल्फीसाठी होकार देत आहेत.

लोकसभेला जेव्हा रीना यांनी मतदाने केले तेव्हा बूथबाहेर लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फीसाठी रांगा लावल्या होत्या. यानंतर त्यांचे फेसबुकवर फॅनफॉलोईंग साडेतीन हजारावर गेले आहे. शेवटी त्यांनी कंटाळून प्रोफाईल लॉक केले आहे.

रीना द्विवेदी यांचे फेसबूक पेजही आहे. यावर त्यांचे 10 हजारावर फॉलोअर्स आहेत. तर या पेजला 9 हजार लाईक्स आहेत.