Palmistry: तळहातावर 'हे' चिन्ह असलेल्या लोकांचा ३५ व्या वर्षानंतर होतो भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:02 PM2024-03-27T16:02:56+5:302024-03-27T16:06:00+5:30

Palmistry: हस्तरेषा शास्त्रानुसार, हातावरील रेषांवरून व्यक्तीच्या भाग्याशी संबंधित गोष्टी कळू शकतात. कधीकधी या रेषा अशी रहस्ये देखील प्रकट करतात, ज्याबद्दल जाणून घेतल्याने काही लोकांना खूप आनंद होतो. तर काहींना भविष्यात घडणाऱ्या त्रासाच्या विचाराने दुःखही होते. तळ हातावरील रेघा फिकट आहेत की गडद, छोट्या आहेत की लांबलचक यावरून जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार की नाही इत्यादी गोष्टींची माहिती मिळते.

मात्र काही खास रेषा असतात, ज्यामुळे भाग्योदयाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात. उदाहरणार्थ, हातावरील काही रेषा सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय सेवांशी संबंधित असतात. जर तुम्ही थोडे कष्ट केले तर तुम्हाला सरकारी नोकरी सहज मिळू शकते. या लेखात आपण तळहातावर M हे चिन्ह असणाऱ्यांबाबत जाणून घेणार आहोत.

M चिन्ह तुमच्या उजव्या किंवा डाव्या तळहातावर असू शकते. तळहातावर जोडलेल्या तीन रेषा इंग्रजी अक्षर M सारख्या दिसतात, म्हणून त्याला M मार्क म्हणतात. असे मानले जाते की असे लोक खूप भाग्यवान असतात. ते कोणतेही काम करत असले तरी त्यात त्यांना यश नक्कीच मिळते.

ज्या लोकांच्या हातावर M खूण असते. ते लोक खूप चांगले नेतृत्त्व करू शकतात हे सिद्ध झाले आहे. असे लोक प्रतिकूल परिस्थितीतही सहज काम करू शकतात. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा गुण त्यांच्यात असतो.

असे लोक बौद्धिकदृष्ट्या अतिशय कुशाग्र असतात. त्यांच्यात कुशल राजकारणी बनण्याची क्षमता असते, या लोकांनी कठोर परिश्रम केले तर ते राजकारणातही उच्च पदे भूषवू शकतात.

तळहातावर M चिन्ह असलेले लोक सर्जनशील असतात. असे लोक चांगले कलाकार, चित्रकार, गायक, अभिनेते, लेखक आणि साहित्यिक असतात. असे लोक प्रेमाच्या बाबतीतही खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना त्यांच्या जोडीदाराची साथ मिळते. याशिवाय त्यांचे वैवाहिक जीवनही चांगले असते.

तळहातावर M लिहिलेल्या लोकांचे नशीब सुरुवातीला तितकेसे प्रभावी नसते पण जसे जसे वय वाढते तसे त्यांचे नशीब चमकू लागते. अशा लोकांचे नशीब वयाच्या ३५ व्या वर्षानंतर चमकू लागते. या वयानंतर माणसाच्या बुद्धिमत्तेची पातळीही वाढते, त्यामुळे तो विचारपूर्वक निर्णय घेतात. तसेच आजवर न उघडलेली यशाची दारे उघडून त्यांना अपेक्षित पद, पैसा, प्रसिद्धी मिळते.