ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना एक महिना नो एन्ट्री; उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

By कमलाकर कांबळे | Published: December 2, 2023 07:58 PM2023-12-02T19:58:12+5:302023-12-02T19:58:30+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले जाणार आहे.

One month no entry for heavy vehicles on Thane-Belapur route; Transport changes for flyover work |  ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना एक महिना नो एन्ट्री; उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

 ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना एक महिना नो एन्ट्री; उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पुढील दीड महिना ठाणे- बेलापूर मार्गावर जड अवजड वाहनांना नो एन्ट्री केली आहे. त्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सूचित केले आहेत. हा बदल ६ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीसाठी लागू असेल, असे वाहतूक विभागाने कळविले आहे.

तुर्भे रेल्वेस्थानक आणि समोरील तुर्भे स्टोअर वसाहतीमुळे ठाणे- बेलापूर मार्गावर नेहमीच चक्का जाम होत आहे. शिवाय याठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचा ठेका महावीर कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला आहे. त्यानुसार ६ डिसेंबरपासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ठाणे- बेलापूर मार्गावरील पावणे गाव येथील अग्निशमन जंक्शन ते बेलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी केली आहे. 

या काळात अवजड वाहनांना अग्निशमन जंक्शनपासून डावीकडे वळण घेत एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. त्याचप्रमाणे तुर्भे नाक्याहून इंदिरानगर सर्कल येथून अमाईन्स कंपनीकडे जाणारी वाहतूकसुद्धा या काळात बंद राहणार आहे. त्यासाठी या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना इंदिरानगर सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे. तुर्भे नाक्याहून हनुमाननगर टी पॉइंट येथून उजवीकडे वळसा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या कालावधीत प्रतिबंध घातला आहे. त्याऐवजी डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे, तसेच उरणफाटा ब्रिजखालून एमआयडीसी मार्गे जाणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे. त्यासाठी उपलब्ध केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतून नियंत्रण विभागाने केले आहे.

Web Title: One month no entry for heavy vehicles on Thane-Belapur route; Transport changes for flyover work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.